एक शेर वाचला. तसा खूप प्रसिद्ध वगैरे आहे, पण एकदा सांगायला हरकत नसावी.
अगर फिरदौस बर रू ए जमीं अस्त
हमीं अस्त ओ हमीं अस्त ओ हमीं अस्त
कदाचित जहांगीरचा असावा. आता जहांगीर कोण तेवढं मात्र विचारू नका. उगीच मला वाटेल तुम्ही सातव्या वर्गात आणखी २-३ वर्ष काढायला हवी होती. तर असंकाही वाचल्यावर आपलं डोकं शांत राहील तर शपथ ! हा फिरदौस नेमका आहे कुठे? जमिनीवर स्वर्ग?
गितांजली वाचत होतो. I want thee, only thee. मध्येच सआदत हसन मंटो वाचत होतो- खोल दो! मी या जगात होतोच कुठे? मी दूर कुठेतरी स्वर्गात होतो. खिसा खाली होता, घरभाड्याचे १४०० रुपये द्यायचे होते – बंजर है सब बंजर है जब ढुंढने हम फिरदौस चले..
अशा वाळवंटातून वाट चाललीये- एका फिरदौसकडे!
आणि या शिवाय आणखी फिरदौस फिरदौस म्हणतात तो आहे तरी काय?

१ प्रतिक्रिया
Comments feed for this article
एप्रिल 14, 2008 at 5:24 pm
sir
गणेशदेवा,
आहात कुठे?
संपर्क करा-
9422176263